spot_img
spot_img

प्रा.प्रविण गायकर यांना व्यवस्थापन विभागात पीएचडी प्रदान

लोणी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.प्रविण गायकर यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून व्यवस्थापन या विभागात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा.प्रविण गायकर यांनी “ महाराष्ट्रातील डाळिंब विपणनाचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विपणन व्यवस्थापन विषयावर शोधनिबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा.प्रविण गायकर यांस पीएचडी पदवी प्रदान केली. व्यवस्थापन विभागातील डॉ. जतीन यादव यांचे त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले. प्रा.प्रविण गायकर हे संगमनेर तालुक्यातील मौजे राजापूर येथील रहिवाशी आहे.

डाॅ. गायकर यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्ह परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.अनिल बेंद्रे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!