लोणी दि.३० ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील अर्थात ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ची विद्यार्थिनी कु श्वेता किशोर बैरागी हीची नुकत्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य 2023 ‘ राष्ट्रीय भारतीय कृषी संशोधन परिषद युवा महोत्सव करिता पार पडलेल्या निवड चाचणी मध्ये ललित कला विभागामध्ये, स्थळचित्र, माती पासून मुर्त्या बनवणे, व्यंगचित्र या प्रकारात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मध्यवर्ती परिसर येथे राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ साठी नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली सदर निवड चाचणीसाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील आठ विद्यार्थी सहभागी होते यामध्ये श्वेता बैरांगी, श्रुती देशमुख, सर्वज्ञ निमसे, प्रथमेश बोराटे, नितीन पांढरे , अंकिता वसावे, ऐश्वर्या ओहोळ, शालेम गावित या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदवला. निवड झालेल्या विद्यार्थिनीला प्रा. सारिका फरगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सहभागी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बेंद्रे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विशाल केदारी, डॉ. आशिष क्षीरसागर, डॉ. काजल खंडागळे, प्रा. संतोष वर्पे, प्रा. राहुल विखे, प्रा. प्रेरणा अभंग, प्रा. अश्विनी घाडगे, प्रा. सत्यन विखे, प्रा. शुभम मुसमाडे यांनी अभिनंदन केले.




Total Users : 630937