spot_img
spot_img

नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची नियुक्ती 

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते अण्णासाहेब पटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी ही नियुक्ती केली आहे.

या निवडीबद्दल काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार लहुजी कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत लुणिया,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर भणगे, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी या निवडीचे स्वागत करून अण्णासाहेब पटारे यांचे अभिनंदन केले आहे.

अण्णासाहेब पटारे हे युवक काँग्रेसचे सलग १२ वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच,तालुका खरेदीविक्री संघाचे १२ वर्ष संचालक होते तर नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आसून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून तालुक्यातील अनेकांनी या निवडीचे स्वागत केले आहे.काँग्रेस पक्षाला तालुक्यात चांगले दिवस असून येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सर्व ताकतीने उमेदवार देणार असून मोठ्या संख्येने तालुक्यात पक्षाच्या शाखा काढून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अण्णासाहेब पटारे यांनी या नियुक्ती नंतर आपली प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात साहेब आदेश देतील त्या प्रमाणे तालुक्यात पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अण्णासाहेब पटारे यांनी स्पष्ट केले. या नियुक्ती बद्दल विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब,प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले,आमदार लहुजी कानडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अंकुशराव कानडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!