spot_img
spot_img

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या कार्यकारी समितीवर यशवंतराव गडाख यांची फेरनिवड. निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन.

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारी समिती वर ज्येष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख यांची सदस्य म्हणून पुढील पाच वर्षासाठी नुकतीच फेरनियुक्ती झाली आहे. 

विश्वासहर्ता ,सर्वोत्तम सेवा हे ब्रीद घेऊन ही प्रतिष्ठान गेल्या ३८ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हा ह्या मूल्यावर चव्हाण प्रतिष्ठानची कार्यप्रणाली आधारित आहे. आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मिती करिता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे. हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रतिष्ठान अहमदनगरसह महाराष्ट्रातील सुमारे २७ विभागीय केंद्रातूनही प्रभावीपणे कार्य करीत आहे.

शिक्षण, आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक महिला व युवा सांस्कृतिक आशा अनेक क्षेत्रातील व्यक्ती संस्थांना प्रतिष्ठानने वेळोवेळी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार हा चव्हाण साहेब यांच्या वृत्ती स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्य, सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. ५ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून आत्तापर्यंत प्रा.मधु दंडवते, सुंदरलाल बहुगुणा, आर. के. लक्ष्मण, सॅम पित्रोदा श्री नारायण मूर्ती व सौ सुधा मूर्ती, इसरो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था, रतनजी टाटा, श्री नंदन निलकेनी, डॉ.रघुराम राजन, अजीम प्रेमजी आशा अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. असल्याची माहिती गडाख यांनी दिली.

अशा प्रतिष्ठित संस्थांच्या समितीवर फेरनियुक्ती झाल्याबद्दल राज्यभरातून अनेकांनी मा खा यशवंतराव गडाख यांचे अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!