spot_img
spot_img

अहमदनगर- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात जवळील ओढ्यामध्ये भरधाव स्कोडा कार पलटी होऊन पाच जणांचा मृत्यू

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-  अहमदनगर- छत्रपती संभाजी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून. नुकत्याच घडलेल्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे.

नेवासा तालुक्यात नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा नजिक त्रिमूर्ती शैक्षणिक संकुला जवळ ओढा आहे. या ओढ्यात संभाजीनगर येथील स्कोडा गाडी उलटून अपघात झाला.या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि.२९ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडली.

या अपघातात एक लहान मुलगी बचावली असून एका लहान मुलीसह तीन महिला व चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

या अपघातात 1)वसीम हरून मुल्ला,2) अनसुरा बेगम हारुण मुल्ला ,3) रेश्मा हलदार,4) हसीना बेगम हरून पठाण,5) सामिया हलदार हे सर्व पिण्यात बुडून मृत्य पावले.तर मासुमा हलदार हि चिमुकली नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून बचावली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!