लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगरचे अप्पर कलेक्टर श्री विकास मारुती पानसरे साहेब यांची कोकण विभाग( मुंबई मंत्रालय) विभागाकडून अतिरिक्त आयुक्त पदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर त्यांची माननीय नामदार महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवडी बद्दल प्रवरा उद्योग समूह तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी प्रवरा उद्योग समूहातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर श्री सुदर्शन पोकळे, धनंजय आहेर, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, राजेंद्र राऊत, दिलीप शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी श्री विकास पानसरे यांच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.




Total Users : 629453