spot_img
spot_img

देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रीत आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार – प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे सनातन हिंदू धर्म संपविण्याची उदयननिधी यांची भाषा बाळासाहेब थोरातांना मान्य आहे का?

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा) :- देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रीत आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. सनातन हिंदू धर्म संपविण्याची उदयननिधी यांची भाषा बाळासाहेब थोरातांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी संपर्क से समर्थन अभियाना दरम्यान उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात “संपर्क से समर्थन” अभियान सुरु आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील या अभियानाचा शुभारंभ संगमनेर येथून करण्यात आला. आमदार बावनकुळे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर विविध योजनांचे लाभार्थी, व्यापारी, नागरीक आणि वेगवेगळ्या समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या योजनारुपी कामांच्या पत्रकांचे वितरण केले. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आ.वैभवराव पिचड, लोकसभा समन्वयक राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, भैय्या गंधे, पदाधिकारी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.पारंपारीक वाद्य आदिवासी नृत्य मल्लखांब खेळाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्य रस्त्यावर उभारलेल्या विविध व्यासपीठावर जावून त्यांनी लाभार्थीशी संवाद साधला आणि मोदीच्या योजनांचे माहीती पत्रकाचे वाटप त्यांनी जनतेत जावून केले.अनेक नागरीकांनी संस्था संघटनांच्या पदाधिकार्यांनी आ.बावनकुळे यांचे स्वागत केले.

आ.बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टिका केली. मोदीजींना पराभूत करण्यासाठी २८ पक्ष एकत्रित आले आहेत. पंचतारांकित हॉटेल मध्ये यांच्या बैठका होतात.या आघाडीत सहभागी असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा उदयन निधी यांच्याकडून हिंदू धर्म संपविण्याची होत असलेली भाषा पवार आणि थोरातांना मान्य आहे का हे विचारण्यासाठी आज संगमनेरात आलो असून यावर तुम्हाला उतर द्यावेच लागेल आशा शब्दात त्यांनी पवार आणि थोरातांवर टिकास्त्र सोडले. संस्कृतीचं रक्षण करण्याच काम हिंदू धर्मान केलं आहे. धर्म संपविण्याच्या भाषा करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले.

मागील नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमांतून विविध समाज घटकांना विकास प्रक्रीयेशी जोडले. मोफत धान्य योजनेपासून ते विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण कारागीरांना मोठ्या संधी त्यांनी प्राप्त करुन दिल्या. या कारणानेच देशातील प्रत्येक माणूस मोदीजींच्या भूमीकेला समर्थन देत असून, 370 कलम रद्द झाल्यानंतर दंगल होण्याची भाषा करणाऱ्यांची सुद्धा तोंडं बंद झालेली आहे. मागील चार वर्षात जम्मू काश्मिर मध्ये लाखो नागरीक गेले आहेत हे केंद्र सरकारचे यश असल्याचे स्पष्ट करुन 22 जानेवारीला देशामध्ये पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे सांगतानाच अयोध्याच्या मंदीरामध्ये रामाची होणारी स्थापना पहाण्याचे भाग्य तुमच्या आणि माझ्या पिढीला अनेक वर्षानंतर मिळाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पाच हजार नागरीकांना अयोध्यादर्शनासाठी नेणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी केली.

आज जगातील ७८ टक्के देशांनी मोदीना पाठींबा दिला आहे.संपर्क से समर्थन अभियानातून जेवढ्या मतदार संघात जात आहे तिथली जनता मोदीना समर्थन देत आहे.आज नागरीकांनी सुध्दा मोदीना समर्थन दिले असल्याने संगमनेर आता मोदीवर प्रेम करणारे शहर झाले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात किती पक्ष येवू द्यात प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीला एकावन्न टक्के मत मिळवायची आहेत. यासाठी मोदीजींच्या योजना संपर्क अभियानातून लोकापर्यत घेवून जा असे आवाहन त्यांनी करतानाच प्रधानमंत्र्याचा विकासचा दृष्टीकोन पटल्यामुळेच अजित पवार सरकार मध्ये सहभागी झाले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!