spot_img
spot_img

पत्रकार विनोद जवरे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव( जनताआवाज वृत्तसेवा):- नेहमीच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात आग्रेसर असणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई कोपरगाव तालुका माजी सचिव विनोद नामदेव जवरे यांना ज्ञानदीप संस्कारम फाउंडेशन यांच्या वतीने माजी विधानपरिषद आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरविण्यात आले.

धोंडेवाडी या छोट्याशा गावातील पाच मित्रांनी स्थापन केलेली ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था राज्यातील अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व संधी उपलब्ध करून देते यातून त्यांनी मागील ५ वर्षांत राज्यातील १४५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक मदत दिली आहे. तर झोपडपट्टीतील व बेघर मुलांसाठी तीन वर्षे रस्त्यावर रात्रशाळा चालवली जाते त्यांना अन्न, कपडे, स्टेशनरीही पुरवली. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांपासून मोफत अध्ययन केंद्र सुरू अशा या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात गेल्या १० वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात अहोरात्र कार्य करत असलेले विनोद नामदेव जवरे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, कोपरगाव पचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब रहाणे, माजी सरपंच बाबुराव थोरात,युवा उद्योजक सचिन गाढे, ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल दरेकर, बाळासाहेब गव्हाणे आदी मान्यवरासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!