spot_img
spot_img

कोल्हारच्या ज्वेलर्समधून ४.७१ लाखांची चांदी गायब सेल्सगर्लवर अपहाराचा गुन्हा; स्टॉक तपासणीत प्रकार उघड

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- येथील अमृता ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शाखेतून ४ लाख ७१ हजार ४० रुपये किमतीचे चांदीचे दागिने व कॉईन गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ज्वेलर्समध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या महिलाविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून ते १५ जुलै दरम्यान महिलाही ज्वेलर्समध्ये सेल्सगर्ल तसेच स्टॉक तपासणीचे काम करीत होती. या कालावधीत तिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्टॉक क्लिअर असल्याचे सांगून व्यवस्थापनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

या प्रकारात १,८९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध प्रकारचे जोडवे, किंमत ४ लाख ३५ हजार ३९३ रुपये, तसेच १५५ ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन, किंमत ३५ हजार ६५० रुपये, असा एकूण ४ लाख ७१ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी संतोष चंद्रकांत मैड (वय ४५, रा. राहुरी फॅक्टरी) यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अडांगळे पुढील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!