मेष –
आपल्या धंद्यात वाढ करू शकाल. तुमचा विचार इतरांना पटवून देता येईल. कठीण काम करा. निष्कारण वाद वाढवू नका. वृषभ – नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. नवीन काम मिळवता येईल. खर्चावर बंधने घाला.राग वाढवू नका. सर्वांशी सुसंवाद राहील.
मिथुन –
महत्त्वाचा निर्णय घेताना सर्वांचा विचार करा. आपल्या कामातील अडचणी कमी होतील. अरेरावी करू नका. नेहमी नम्रपणे बोला.
कर्क –
महत्त्वाची रेंगाळलेली कामे होतील. उत्साह वाढेल. नाराज झालेल्यांना खूश करता येईल. धंदा वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
सिंह –
अनुभवी माणसांचा सल्ला उपयोगी येईल. सर्वांचे सहाय्य घेता येईल. मोठ्यांचा मान राखा. मैत्री होईल. सावधपणे गुंतवणूक करावी.
कन्या –
गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करावा. आपला प्रभाव पडेल. आपल्या धंद्यात वाढ होईल. भागीदाराबरोबर चर्चा यशस्वी होईल.
तूळ –
आर्थिक स्थिरता लाभेल. अनेक कामे करण्याचा प्रयत्न त्रासदायक ठरेल. मनाची द्विधा अवस्था होईल. वेळेनुसार निर्णय घ्या.
वृश्चिक –
व्यवसायात अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्या रागावर ताबा ठेवावा.
धनु –
व्यवसाय, नोकरीत प्रतिष्ठा प्राप्त होईल. नवीन योजना राबवता येतील. नवीन ओळख झाली तरी मोहात पडू नका. सावध राहा.
मकर –
कामात तत्परता दाखवाल. आपला प्रभाव पडेल. स्पर्धा जिंकता येईल. ओळखी वाढतील. वसुली करा. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
कुंभ –
कौटुंबिक समस्या सोडवाल. नातेवाईकांशी, आप्तेष्टांशी भेटीचे योग आहेत. कुणालाही कमी लेखू नका. तुमचे विचार योग्य ठरतील.
मीन –
धंद्यात फायद्याचे काम मिळेल. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. चर्चा यशस्वी होईल. निर्णय अचूक ठरेल. जुने मित्र भेटतील.




Total Users : 606906