spot_img
spot_img

मुकुंदनगर हल्ला प्रकरणातील धीरज परदेशी यांचे निधन, रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांची उपचारादरम्यान दुर्दैवी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांनी गर्दी केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धीरज परदेशी यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते आणि खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

या प्रकरणात महापालिकेतील वायरमन युनूस शेख याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

धीरज परदेशी यांच्या निधनामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रुग्णालय परिसरात आणि संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत हल्ल्याचा मास्टरमाईंड, आर्थिक पाठबळ देणारे आणि संपूर्ण कट उघड करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यापूर्वी अशा घटना घडूनही प्रभावी कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!