अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्ह्यातील एका शहरातील चर्चेत असलेल्या एका प्रकरणाची माहिती पत्रकारांपर्यंत एका नेत्याच्या स्वीय सहायकामार्फत पोहोचल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. संबंधित माहिती पत्रकारांपर्यंत नेमकी कोणत्या उद्देशाने पोहोचविण्यात आली, याबाबत आता सवाल उपस्थित केले जात आहेत.
या माहितीमागे नेमका कोणता हेतू होता, केवळ वस्तुस्थिती माध्यमांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश होता की त्यामागे राजकीय संदर्भ होता, याबाबत त्या शहरातील काही नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, या प्रकरणाचा वापर राजकीय विरोधकांविरोधात होऊ शकतो का, अशी शक्यताही काहीजण व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे सार्वजनिक झालेले नसल्याने सध्या ही केवळ राजकीय वर्तुळातील चर्चा असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्वीय सहायकाच्या भूमिकेमुळे संबंधित नेता पुन्हा राजकीय अडचणीत येणार का, याबाबतही चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे संबंधित नेत्याबाबत काही नागरिक व नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पत्रकारांपर्यंत संबंधित माहिती नेमकी कोणी आणि कोणत्या उद्देशाने पोहोचविली, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणातील तथ्य स्पष्ट करण्यासाठी संबंधित नेता आणि त्यांच्या स्वीय सहायकाची अधिकृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांची बाजू समोर आल्यानंतरच या चर्चेतील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




Total Users : 608018