लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील साई सदिच्छा ग्रुप व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ८ जानेवारी या कालावधीत श्री साईचरित्र पारायण व संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष असून अधोध्या येथील श्रीराम मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठापणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रामायणाचार्य ह.भ.प. सोनाली दिदी करपे याठिकाणी सायं.६ते ९ या वेळेत रामायण कथा करणार आहेत.सात दिवस होणाऱ्या या सोहळ्यात दररोज पहाटे ५ वा. श्री साईचरित्र ग्रंथ वाचन,भजनसंध्या,हरिपाठ आणि दररोजचा महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न होणार असून या सोहळ्यानंतर अध्योया,काशी प्रयागराज या तिर्थक्षेत्रांचा दर्शन सोहळाही संयोजकाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचा दिपप्रज्वलन समारंभ हा १ जानेवारी रोजी ह.भ.प. निवृती महाराज देशमुख यांच्या किर्तनाने होणार असून कार्यक्रमाची सांगता ८जानेवारी रोजी सकाळी ११वा.रामायणाचार्य ह.भ.प. सोनाली दिदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे,या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे अहवान श्री साई सदिच्छा ग्रूपच्या वतीने करण्यात आले आहे.



