एकरुखे( जनता आवाज वृत्तसेवा ): – राहाता तालुक्यातील धनगरवाडीत दिवसाच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.धनगरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात दुपारी चार वाजे दरम्यान स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसुन आल्याचे धनगरवाडी ग्रामस्थांकडुन सांगितले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
दैवबलवत्तर की शनिवार असल्याने मुलांना सकाळची शाळा होती त्यामुळे शाळेमधुन मुले आपआपल्या घरी गेली होती अन्यथा मुलांच्या जीविताला धोका संभवला असता या चर्चेनेच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन धनगरवाडी परिसरात पिंजरा न लावल्याने वनविभागाच्या कारभारावर धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
बिबट्याचे धनगरवाडी परिसरात थैमान सुरुच आसुन दहा दिवसापूर्वी वाकडी दिघी रस्त्यावर बिबट्याने एका मोटरसायकल वर सायंकाळी सहा वाजे दरम्यान हल्ला चढवत आशा सोनवणे या महिलेस जबर जखमी केले होते त्या महिलेवर गणेशनगर येथील डॉ. निर्मळ यांनी प्रथमोउपचार करत अहमनगर येथिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला असता त्यांना सिव्हिल येथे चोविसतासांच्या डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवुन सोडुन देण्यात आले होते. तर पती गोरक्षनाथ सोनवणे यांना देखील बिबट्याने किरकोळ जखमी केले होते. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करताच त्यांनी आरडा ओरड केला त्यांचा आवाज ऐकून तेथे जवळ असलेल्या चौधरी वस्ती वरील माणसे मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळल्याचे या दांम्पत्याने सांगितले.
तर याच परिसरात दोन युवकांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. तर दोन महिन्यापूर्वी बिबट्याने अहिल्यादेवीनगर येथे रात्री नऊच्या दरम्यान दोन शेळ्या फस्त करत एका कुत्र्यावर हल्ला केला होता पुढे दुसऱ्या दिवशी बिबट्याने रक्टेवस्ती वरील एका शेळीवर हल्ला चढवत तिचाही फडशा पाडला तर धनगरवाडीत आतापर्यंत बिबट्याने पंधरा ते वीस कुञ्यांना भक्ष बनविले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी धनगरवाडीचे सरपंच गोपिनाथ खरात अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे आध्यक्ष तथा उपसरपंच साहेबराव आदमाने मा. उपसरपंच अनिल रक्टे तसेच ग्रामपंचायत सदस्य व धनगरवाडी ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे करुन देखिल आद्यापपर्यंत वनविभागाने धनगरवाडीत पिंजरा लावलेला नसल्याने नेमके वनविभाग मोठा अनर्थ घडण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे



