spot_img
spot_img

राष्ट्रवादी अजित पवार गटाची उत्तर नगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांची माहिती

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-अ नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेवरून उत्तर नगर जिल्ह्याची सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यातआली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडले त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांनी मुंबई येथे झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीला समर्थकांसह हजेरी लावली होती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजीमंत्री सुनील तटकरेयांनी कपिल पवार यांच्यावर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे पवार यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या सूचने नुसार आगामी विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उत्तर नगर जिल्ह्या तील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली आहे लवकरच नव्याने कार्यकारणीजाहीर केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिर्डी लोकसभा अध्यक्ष कपिल पवार यांनी दै जनता आवाजशी  बोलताना सांगितले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!