spot_img
spot_img

प्रवरेच्या गृहविज्ञान आणि संगणकशास्ञ महाविद्यालयातील निकिता जवरे यांची निवड

लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ,लोणी या संस्थेतील गृहविज्ञान आणि संगणकशास्त्र महिला महाविद्यालय, लोणी येथील संगणकशास्त्र या शाखेतील विद्यार्थिनी कु .निकिता बाळासाहेब जवरे हिची स्पायजेट लिमिटेड,हरियाना,दिल्ली या विमान क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये दिल्ली येथे निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी दिली.

कंपनीची लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखत संस्थेच्या पी.व्ही.पी.महाविद्यालयात घेण्यात आली होती. त्यासाठी प्लेसमेंट चे समन्वयक प्रा. एस. एम. मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा राजश्री तांबे, विभाग प्रमुख प्रा. संजय वाणी, प्रा. संजय वाणी यांनी मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खासदार डाॅ.सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारीडॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ.प्रदीप दिघे शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, मनोज परजणे यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!