spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी राहुल लोखंडे तर सरचिटणीस पदी सुभाष चव्हाण यांची निवड.

नेवासा फाटा( जनता आवाज  वृत्तसेवा ):- राज्यातील सर्वात मोठी संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी राहुल दत्तात्रय लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नेवासा येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या तालुका मेळाव्यासाठी राज्याचे सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब गाढवे यांची तसेच उच्च अधिकार समितीचे सदस्य अरविंद थोरात यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. सदर कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव व महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी सर्वानुमते राहुल लोखंडे यांची नेवासा तालुकाध्यक्षपदी तर सुभाष चव्हाण यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!