नगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा रविवार दि. 14 रोजी आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या या महाविजय 2024 मेळाव्यास राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व राहणार आहे. मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अहमदनगर शहरातील बंधन लाॅन्स येथे होणा-या या महाविजय 2024 जिल्हास्तरीय मेळाव्यास सकाळी अकरा वाजता सुरुवात होईल. यावेळी भाजपचे आजी-माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आजी-माजी आमदार, महापालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) व रासपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.