spot_img
spot_img

बेलवंडी पोलीस स्टेशन चा स्नेहालयातर्फे सन्मान

श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानव तस्करी करून आणलेल्या एकूण 23 वेठबिगारांची बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाने सुटका केल्याने सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या व अहमदनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्री -अत्याचार पीडित महिला व मुलांचे तसेच नवजात अर्भकांचे पुनर्वसन करणाऱ्या स्नेहालय परिवाराचे श्री गिरीश कुलकर्णी यांनी पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे केअर संस्थेचे डॉक्टर महेश कुमार वडोदरे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी मानव सेवा प्रकल्प येथे भेट देऊन सदर श्री अमृतवाहिनी. संस्थेच्या मानव सेवा प्रकल्पाच्या अडचणी लक्षात घेऊन मानव सेवा प्रकल्पात संगोपन होत असलेल्या सर्व २३ पीडितांचे पुनर्वसनाकरिता स्नेहालय संस्थेस केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन मुक्त केलेल्या एकूण 23 वेठबिगारांचे स्नेहालयामार्फत पुनर्वसन करण्याची जबाबदारी अवघ्या २४ तासात पूर्ण निवासाची/संगोपनाची तयारी स्वीकारली.

सदर पुनर्वसनाच्या कार्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखरे साहेब यांचे तसेच स्नेहालयाचे श्री गिरीश कुलकर्णी, श्रीअनिल गावडे, श्री भूषण देशमुख श्री प्रवीण मुत्याळ मानव सेवा प्रकल्पाचे श्री गुंजाळ व श्री शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!