लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-सादतपूर येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय हर्षल राहुल गोरे गंभीर जखमी झाला.सदर घटना सादरपूर येथील गोरे वस्तीवर सायंकाळी चार ते साडेचार च्या दरम्यान घडली. राहत्या घरा कडून चुलतेच्या घराकडे जात असताना रोड लगत गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षल वर झडप घालून त्याला गिन्नी गवतात ओढून मेले असता त्याचा भाऊ वाघ वाघ ओरडत घराकडे पळाला. हर्षल चे घरचे सर्व ओरडत गवताकडे पळाले असता बिबट्याने तिथून धूम ठोकली.जखमी हर्षल राहुल गोरे यास उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्याने आज सादतपूर मध्ये पुन्हा पाच वर्षे बालकावर हल्ला करून त्याला ठार केले. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे सादरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
गेल्या दहा दिवसापासून वन विभागाने विविध ठिकाणी १५ पिंजरे लावले आहेत. पण आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या पिंजऱ्यात काय झाला आहे. वन विभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करत आहेत. नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



