spot_img
spot_img

आ.थोरात यांच्या पाठपुराव्यातून साकारली उत्पादन शुल्क विभागाची हायटेक इमारत शहराच्या वैभवात भर टाकणारी इमारत

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका व शहर विकासाचे मॉडेल बनवताना हायटेक बस स्थानक, प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय, पंचायत समिती ,कोर्ट, बायपास यांसह विविध अत्याधुनिक इमारती उभ्या केल्या असून यात नव्याने साकारलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवी इमारत ही शहराच्या वैभवात भर टाकणारी ठरणारी झाली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही राज्यातील सर्वात मोठी व प्रशस्त अत्याधुनिक व हायटेक इमारत महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची उभी राहिली आहे.

संगमनेर शहर हे आर्थिक दृष्ट्या संपन्न असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय इमारत व निवासस्थान बांधणीकरता काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला . या इमारतीच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 मध्येच प्रशासकीय मंजुरीचे आदेश मिळाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच काँग्रेस पक्षाचे नेते तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या कामासाठी 2019 मध्ये या कामाला मोठ्या प्रमाणात निधी देऊन सुरुवात केली.

अत्यंत प्रशस्त असलेल्या या इमारतीत ग्राउंड फ्लोअरला पार्किंग, पहिल्या व दुसरा मजल्यावर कार्यालये , छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग, संरक्षक भिंत याचबरोबर कर्मचाऱ्यांकरता निवासस्थान इमारत क्रमांक एक, निवासस्थान इमारत क्रमांक दोन, पंप हाऊस ,कॉन्क्रीट रस्ता , पेव्हिंग ब्लॉक, डीस मेंटलिंग ग्राउंड, डेव्हलपमेंट यांसह विविध कामांचा समावेश आहे. या कामाकरता आमदार थोरात यांनी 4 कोटी 28 लाख 19 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता.

2019 नंतर या कामाला सातत्याने सुरुवात झाली कोरोना काळातही काम सुरू होते. मात्र आता हे काम पूर्णत्वास आले असून या इमारतीमुळे शहराचे वैभव वाढले आहे.

अत्यंत दिमाखदार व अत्याधुनिक असलेली ही इमारत राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यात प्रथम क्रमांकाची इमारत ठरली आहे.सातत्याने विकास कामांबरोबर वैभवशाली इमारतीसह शहराचा सुंदरपणा वाढवण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कामामुळे संगमनेर शहर व तालुका हे विकासाचे मॉडेल व आदर्शवत शहर ठरले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!