पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय आयोजित एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत शिरूर येथील विद्याधाम प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेस प्रशालेतील एकूण २४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. दोन्ही परीक्षांचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य संजय शेळके यांनी दिली.
एलिमेंटरी परीक्षेस एकूण १३० विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, १६ विद्यार्थ्यांना ‘ ब’ श्रेणी तर ९२ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे.’अ’ श्रेणी पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे – अनुजा अफजलपुरकर, स्नेहा आटोळे, वैष्णवी भिसे, देवांश भांडारकर, विराज बोरकर, मानसी दिवेकर, गिरीजा गायकवाड, प्राप्ती गाढवे, वेदिका घायतडक, कृतिका गोरखे,साईराज जगदाळे, शुभम खोडदे, ज्ञानेश्वरी खेतमाळीस, प्रणिता कोल्हे, दिया माने, अक्षरा मैड, अनुष्का नाईक, नेहा पारंडे, यशराज पाचर्णे, आदिती शेळके, हर्षल यादव, वैदेही झावरे तर इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ठ ११६ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत,१५ विद्यार्थी ‘ ब’ श्रेणीत व ७८ विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.’अ ‘ श्रेणी प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे -तन्वी यादव, परिमा भंगाळे, आर्या बोरा, रोशनी जाधव, अलिशा शेख, अनुष्का जगताप, संपदा सोनवले, दिव्यांका वाळुंज, श्रद्धा पेटकर, श्रुतिका शेळके, आर्या आवारी, स्नेहल कोकडे,दर्शन वेताळ, ओम जगताप, वेदांत निर्मळ, अथर्व खेमनर, सुजल गोरडे, ओम नागवडे, नचिकेत शेलार, आयुष मुथा,अतिश ओहोळ, सिद्धार्थ गायकवाड, कुंजल धाडीवाल.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील कलाशिक्षक ऋषीकेश सूर्यवंशी, नामदेव हिवरकर व प्रकाश देवकर यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कला शिक्षकांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंदजी फुलफगर,प्राचार्य संजय शेळके ,पर्यवेक्षक गुरुदत्त पाचर्णे ,बाबुराव कोकाटे, शिवाजी पर्बत यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.



