पुणे (प्रतिनिधी):- सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सर्वच पक्षांमध्ये सत्तेसाठी चढावर सुरू आहे. यातच पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार.
पुण्यात तीन चार महिन्यापूर्वी विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली होती, कसबा आणि पिंपरी या मतदारसंघातील पोटनिवडणूक झाली होती. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंनगेकर हे विजयी झाले होते. तर पिंपरीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. ही निवडणूक ताजी असताना, आता पुण्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे चाहुल लागले आहे. दिवगंत भाजपा खासदार गिरीष बापट यांचे मागील महिन्यात निधन झाले. यानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. या धरतीवर आज अजित पवारांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात गिरीष बाटप यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच, असं पवार म्हणाले. तसेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीने या लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.
भाजप-कॉंग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु. अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे. पण येथे राष्ट्रवादीची पण बरीच ताकद आहे. त्यामुळं येथे आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना भावी खासदार अशा शुभेच्छा देणारे पोस्टर्स पुण्यातील चौकात झळकले होते. तसेच भाजप आणि कॉंग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. मात्र राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये युती व महाविकास आघाडीमध्ये सत्ता संघर्ष हा अतिशय टोकाला गेलेला दिसत आहे.
पुणे व बारामती लोकसभा या दोन्हीही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षा करिता प्रतिष्ठेच्या आहे.