3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोल्हेवाडी रोड दिल्लीनाका दोन दिवसात अतिक्रमण मुक्त न झाल्यास मोर्चा हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठकीत झाला निर्णय

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वर दोन लहान मुलींच्या वडिलांना त्यांच्या समक्ष मारहाण करण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी तरुण चांगलाच आक्रमक झाला आहे. ही घटना या भागात झालेल्या अतिक्रमणामुळेच झाली आहे . त्यामुळे या भागात असणारे बेकायदेशीर अतिक्रमण दोन दिवसामध्ये प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी. जर अतिक्रमण दोन दिवसमध्ये काढले नाही तर तर संगमनेरातील सर्व हिंदुत्व वादी संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय शासकीय विश्रामगृहा जवळ झाले ल्या हिंदुत्ववादी तरुणांच्या बैठकीत घेण्यात आला.

कोल्हेवाडी रोड वरून जाणाऱ्या राहुल सोपान गुंजाळ हा तरुण आपल्या दोन मुलींसह मोटर सायकलवरून कोल्हेवाडी रोडने संगमनेर कडे येत होता. त्याचवेळी दिल्ली नाक्याकडून भरघाव वेगाने आले ल्या एका पिकअपच्या चालकाने गुंजाळ यांच्या मोटरसायकला कट मारला. त्याचा जाब विचारला असता त्या भागातीलजमा वाने गुंजाळ यांना त्यांच्या दोन मुलींच्या समक्ष जबर मारहाण केली त्यामुळे त्या दोन्ही मुली रडत होत्या याची थोडीही दयामया आली नाही या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी जाहीर शब्दात निषेध केला आहे पोलिसांनी तीनजणांवर आर्म ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे हिंदुत्व वादी तरुण चांगलाच आक्रमक झाला आहे.

संतप्त झालेल्या सर्व हिंदुत्ववादी संघट नेच्या तरुणांनी एकत्रित येत शासकीय विश्रामगृहाच्या मागे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक हिंदुत्व वादी तरुणांनी पोलीस प्रशासनावरती आपली नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला. यावेळी कोल्हेवाडी रोड वरील घटना ही त्या भागात एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी केलेल्या अनधिकृत अतिक्रमणा मुळेच झाली आहे. त्यामुळे जसा प्रशास नाने जोर्वे नाका अतिक्रमण मुक्त केला तसाच दिल्लीनाका कोल्हेवाडी रोड सुद्धा अतिक्रमण मुक्त करावा. तसेच या भागा मध्ये रात्री सुरू असणारी होऊ शकते या दिवसाची सुरू आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील गो हत्या कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे तसेच परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी शहरात सुरू असणाऱ्या सर्व रिक्षांची कसून चौकशी करून अधिकृत परवाना असलेल्या रिक्षांनाच परवानगी द्यावी. उर्वरित अनाधिकृत रिक्षा बंद कराव्यात या प्रमुख मागण्या हिंदुत्वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत जर दोन दिवसात या कोल्हेवाडी परिसरातील अतिक्रमण मुक्त झाले नाही आणि मारहाण करणारे अटक झाले नाही तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमकभूमिका घेणार आहे त्यामुळे होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या बैठकीत हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

कोल्हेवाडी रोड अतिक्रमणमुक्त झाला नाही तर आंदोलन 

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील नागरिकांना याच दिल्ली नाका व कोल्हेवाडी रोडने जावे यावे लागत आहे. या भागात झालेल्या अतिक्रमणामुळे या भागातील लोकांची मगरुरी वाढली आहे विनाकारण कोल्हेवाडी गावात जाणाऱ्या येणाऱ्या तरुणींना या भागातील तरुण त्रास देत आहे .त्यामुळे हा कोल्हेवाडी रोड परिसर दोन दिवसात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे असा ठराव कोल्हे वाडी ग्रामपंचायतीच्या तातडीच्या झाले ल्या ग्रामसभेत केला जर अतिक्रमण मुक्त झाला नाही तर परिसराच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा असल्याचे भास्क रराव दिघे प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे,सरपंच सुवर्णा दिघे,दादासाहेब गुंजाळ अमोल दिघे थोरात साखरकारखा न्याचे संचालक तुषार दिघे आणि पद्मावती दूध संस्थेचे अध्यक्ष शिवाजी खुळे यांनी दिला आहे.

दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड अतिक्रमण मुक्त करण्याच्या प्रश्नासाठी एकत्रित आले ल्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!