3.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

केंद्रीय मंत्रीअमित शहा आणि ना.विखेच्या भेटीचे महत्व खा.लंकेना काय समजणार-भालसिंग 

नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात मध्ये अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायला प्रोत्साहन दिले.दूधाच्या प्रश्नाबबात मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खा.लंकेना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावला.

दूध प्रश्नाच्या संदर्भात दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या भेटीबाबत खा.निलेश लंके यांनी केलेल्या टिकेचा दिलीप भालसिंग यांनी चांगलाच समाचार घेतला.

दूधाच्या प्रश्नाबबात कोणतीही माहीती नसलेले स्वयंघोषित नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकारण करीत आहे.परंतू त्यांच्या नौटंकीला शेतकरी ओळखून असल्याने आजच्या आंदोलनचा फज्जा उडला असल्याची टिका भालसिंग यांनी केली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना.विखे पाटील यांनी दूधाच्या प्रश्नाबबात घेतलेली भेट खा.निलेश लंके यांना समजायला वेळ लागेल असा उपरोधिक टोला लगावून भालसिंग म्हणाले की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या माध्यमातून अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायाला पाठबळ त्यामुळेच मंत्री विखे पाटील यांनी शहा यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण असताना या भेटीवर खा. निलेश लंके यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आणि किव करणारे असल्याचे म्हणाले.दूधाच्या प्रश्नावरून संसद बंद पाडू म्हणणारे अधिवेशनात एक शब्दही काढू शकले नाही.यासाठी प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो.

राज्यातील महायुतीचे सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मंत्री विखे पाटील यांनी त्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे दूध उत्पादकांना ३०रुपये भाव आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुर्वी भाजपाचे सरकार असताना सुध्दा अनुदान दिले गेले होते.पण आज दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्यांनी राज्यात त्यांचे आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना काय दिले असा सवाल भालसिंग यांनी उपस्थित केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!