शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-आज आषाढी एकादशीच्या दिवशी श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात अध्यक्ष विजयराव कोते पाटील व उपाध्यक्ष ताराचंद कोते पाटील यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला. यामध्ये शाळेचे प्राचार्य डॉ. श्री गणेश डांगे सर, मुख्याध्यापक संदीप डांगे सर व माननीय चाफेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
” साईनगरी अवतरली पंढरी” या उक्तीप्रमाणे साई निर्माणचा परिसर अवघा पंढरीमय झाला. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच एअरपोर्टरोड ते साई द्वारका सर्कल पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते,सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती, साई निर्माण करिअर ॲकडमीच्या मैदानात संस्थेचे अध्यक्ष श्री विजूभाऊ कोते पा. यांच्या आई सौ. भिमाबाई कोते, कविता ताराचंद कोते, वंदना विजयराव कोते, लिलाबाई कोते यांच्या हस्ते पाडूरंगाची आरती करून पालखीचे पुजन करण्यात आले…
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



