spot_img
spot_img

लोणीत उद्या प्रवरेच्या चार हजार विद्यार्थ्याकडून पारंपारीक वाद्यात बाप्पा निरोप ढोल ताशा, लेझीम, झांज, पावली आणि लाठी काठी पथकांचा आगळावेगळा कला अविष्कार

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी मतदार संघात सुरु असलेल्या प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाची सांगता आणि बाप्पांची विसर्नन मिरवणूक मंगळवारी लोणी येथे प्रवराच्या शैक्षणिक संकुलाच्या चार हजार विद्यार्थ्यांच्या ढोल ताशा, लेझीम, झांज, पावली आणि लाठी काठी अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमातू गणपती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. या निमित्ताने प्रवरानगरी आणि प्रवरेचे विद्यार्थी हे सज्ज झाले आहे.

राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव हा आगळावेगळा ठरत असतो. यावर्षीचा गणेशोत्सव हा आगळावेगळा ठरण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिताताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरेतील ११५ शाळांच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये ढोल ताशा लेझीम झांज पथकाच्या माध्यमातून गणपती बाप्पांचा स्वागत करण्यात आले. मंगळवारी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संकुलातील जवळपास चार हजार विद्यार्थी ढोल ताशा लेझीम झांज पावली आणि लाठीकाठी अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाने गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक ही ऐतिहासिक ठरणार आहे. या उपक्रमांची तयारी पुर्ण झाली असून मंगळवारी सकाळी नऊ वाजता जुने पायरेन्स या ठिकाणाहून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

यावेळी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. हा सोहळा नयनरम्य ठरावा यासाठी जय्यत तयारी संस्थेच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून डी.जे मुक्त गणपती हा संदेश शिर्डी मतदारसंघातील अनेक गावांनी आणि अनेक शाळांनी दिला आहे. या उपक्रमामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!