spot_img
spot_img

प्रवरेच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी ‘श्रीं’ना दिला निरोप

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा) :- ढोल, ताशांचा गजर, भगव्‍या झेंड्याच्या नृत्याला टाळ मृदूंगाची साथ आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष करीत लाडक्या गणरायाला प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने निरोप दिला. डि.जे मुक्त गणेश उत्सव आणि ‘सहकारातून समृद्धीकडे’ आशा संदेशाने संपन्न झालेल्या गणेश उत्सवाने शिक्षण संस्थापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

प्रवरा परीसरात महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम २४ वर्षापासून सुरू आहे. या उप्रकमाला यंदाच्या गणेश उत्सवात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने नवी उंची मिळाली. संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सहभागाने यंदा प्रवरा शैक्षणिक व क्रीडा महोत्सव गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. विविध भरगच्च आशा सांस्कृतिक कार्यक्रमातून सजलेल्या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता भव्य आशा मिरवणुकीने करण्यात आली.

सकाळी ९.३० वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.

विविध शिक्षण संस्थेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचा समूह वेगवेगळ्या पथकातून आपल्या कलेचा अविष्कार तितक्याच उत्साहाने दाखवत होता. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांची प्रतिकृती आणि पहील्या साखर कारखान्याची उभारणी त्यांनंतर झालेला परीसराचा विकास दर्शविणारा चित्ररथ मिरवणुकीच्या अग्रस्थानी होता. त्यानंतर ढोल आणि ताशा पथकातील विद्यार्थ्यांच्या वादनाने भारावलेल्या मंत्री विखे पाटील यांनीही ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

प्रत्येक वादन पथकात जावून विद्यार्थ्यांशी मान्यवरांनी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. टाळ आणि मृदूंगाची साथ घेवून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या वारकरी सांप्रदायातील वेषभूषेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. भगव्या झेंड्याने संपूर्ण परीसरारचे वातवारण भक्तिमय झाले होते. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली गणेश विसर्जन मिरवणूक पाहाण्याकरीता रस्त्याच्या दुर्तफा नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयघोषाने परीसर दुमदुमून गेला.

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!