spot_img
spot_img

मानव सेवा प्रतिष्ठानचे मोहोज खुर्द गावात स्वच्छता अभियान

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहोज खुर्द येथील मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय,नेहरु युवा केंद्र व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र) यांच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले.या अभियानाप्रसंगी मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील मतकर,सचिव बाळासाहेब मतकर,विष्णू दातीर,विठ्ठल दातीर,अंगणवाडी सेविका अलका मतकर,मदतनीस वैशाली डोईफोडे,शुभम मतकर,कारभारी वांढेकर,नवनाथ वांढेकर,देविदास मतकर,सिताराम वांढेकर,मोहन वांढेकर,पारूबाई वांढेकर,जगमित्र मित्र मंडळचे सदस्य सहभागी झाले होते.

गावचे ग्रामस्थ रघुनाथ वांढेकर,पप्पू वांढेकर,भीमराज वांढेकर,उषाबाई आदी उपस्थित होते.प्रा.डॉ.सुनील मतकर म्हणाले की,शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.त्याचे दुष्परिणाम साथीच्या आजारातून दिसत आहे.स्वच्छतेवर निरोगी आरोग्य विसंबून असून मनुष्य स्वच्छतेचे भान विसरल्याने रोगराईला बळी पडत आहे.भावी पिढीत व नागरिकांमध्ये स्वच्छतेचे मुल्य रुजविल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रा.डॉ.मतकर यांनी सांगितले.

या उपक्रमाद्वारे निवारा केंद्रातील विद्यार्थी व संस्थेच्या प्रतिनिधींनी निवारा केंद्र परिसर,जय बजरंग व्यायाम शाळा,जगमित्र गुरुकुल परिसर व वीरनगर भागात स्वच्छता केली.या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराईची माहिती देऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देणार नाही व स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात,सिद्धार्थ चव्हाण,रमेश गाडगे,जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे,क्रीडा अधिकारी भाऊराव वीर,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे,विशाल गर्जे,सुनील धारुडकर,जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!