लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा.संदीप म्हस्के यांना वनस्पतीशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
EFFICACY OF CHEMICAL HERBICIDE FOR WEED MANAGEMENT IN MAIZE (ZEA MAYSL.) या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांना कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या मा. डॉ. एस. पी. सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. ते सध्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पा., अहिल्यानगर दक्षिणचे मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पा. सचिव भारत घोगरे पा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे महाविद्यालयाचे प्राचार्य बारगुजे उपप्राचार्य वाणी व सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.



