spot_img
spot_img

महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेऱ्यांना उपनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा मतदारांशी सुसंवाद साधत प्रभाग क्रमांक ५ मध्ये पोहोचली. येथील भिस्तबाग चौक, श्रमिकनगर बालाजी मंदिर, शिवकृपा कॉलनी, वैदुवाडी, कुष्ठधाम रोड, सोनानगर चौक, नवीन प्रेमदान हडको या उपनगरांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. सर्व भागांमध्ये महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.

प्रचार फेरीचा शुभारंभ यावेळी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंधे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी नगरसेवक मनोज दुल्लम, सोनाबाई शिंदे, उदय कराळे, सतिश शिंदे, अजिंक्य बोरकर, शिवसेनेचे काका शेळके, सतिश बारस्कर, नितीन शेलार, सचिन जगताप, बाळासाहेब निकम, सुमित कुलकर्णी, आदींसह मोठ्या संख्यने महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले, आपल्या शहराची वाटचाल आता वेगाने विकासाच्या दिशेने चालली आहे. शहर व उपनगरातील सर्व भागांमध्ये मोठ्याप्रमाणात विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचे समाधान प्रचारा दरम्यान नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त करत मला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ही निवडणूक नागरिकांनीच हातात घेतली आहे.

यावेळी किरण बारस्कर, जय दिघे, सूरज वाकळे, गजू भांडवलकर, नमन महांकाळ, सुरज शिंदे, राहुल शिंदे, शिवाजी शिंदे, अजिंक्य पानसंबळ, गौरव पाटोळे, अमित वाघमारे, पियुष मनोचा, योगेश ठुबे, शिवाजी डोके, विशाल म्हस्के, तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी या प्रचारफेरीला उपस्थित होते.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!