लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा समावेशित विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात बालकांसाठी मोफत शिबीरं आयोजित करण्यात आले आहे. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी राहाता आणि २७ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रीया पुर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली असल्याची माहीती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
या शिबीरात बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत शुन्य ते सहा वर्ष शालेय वयोगटातील, सहा ते अठरा वर्ष वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून, या तपासणी शिबीरात आवश्यकता असेल त्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रीयाही करण्यात येणार आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी पासून या उपक्रमास प्रारंभ झाला असून, नेवासा येथील ९९ तसेच राहुरी तालुक्यातील ११४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना व आरबीएसके योजनेतून डॉ.विखे पाटील मेमोरीअल हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टराच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. शुन्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
दिनांक २१ फेब्रुवारी रोजी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात आणि २७ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रीया पुर्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून, या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Total Users : 624256