संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सुप्रसिद्ध असलेले जोशी स्वीट होमची अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांच्याकडून चौकशी सुरू आहे. जोशी स्वीट होमच्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील त्यांच्या मुख्य दुकानात तपासणी करण्यात आली व त्यावर अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील अनेक स्वीट होमची तक्रारी ह्या अन्न व औषधे प्रशासनाकडे केली जात होती. परंतु अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नव्हते. दखल न घेण्याचे कारण आर्थिक तडजोडी असल्याची चर्चा नेहमी नागरिकांमध्ये होत असत परंतु अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे निदर्शनात आणून दिले जात असत.
गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर येथील जोशी स्वीट होम हे विशेषतः जिलेबी, गुलाबजाम आणि मिठ्ठावडा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील सर्वच गोड आणि खारामाल संगमनेर शहर आणि तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. राज्यातील संगमनेरमधील रहिवासी देखील जोशी स्वीट होम मध्ये खायला इथे घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. . मात्र या दुकानाविषयी अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्यानंतर हे दुकान चर्चेत आले आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जोशी स्वीट होमची तपासणी केली असून या सदर्भात एक सविस्तर अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून या वादग्रस्त मुद्द्यांवर तपासणी सुरू आहे. तसेच येथील मालामध्ये काही भेसळ होते काय याचे देखील नमुने पाठवून त्याचा देखील अहवाल देखील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असून काही नमुने पुन्हा तपासण्यासाठी घेतले जाण्याची शक्यता आहे.
संबंधित दुकानदाराला नोटीस काढून त्रुटींची पूर्तता करण्यास सुचविण्यात आले आहे. अहवालावर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अन्नपदार्थांचे अहवाल प्राप्त झाल्यावर देखील संबंधित स्वीट होम वर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे अन्नसुरक्षा अधिकारी प्र. प. पवार यांनी सांगितले आहे.
अहिल्यानगर मध्ये जे स्वीट होम चालवितात ते अधिकतम परप्रांतीय आहेत. पर राज्यातून आलेले हे लोक व्यवसाय करताना दुधापासून तयार झालेला खवा न वापरता मावा नावाचा पदार्थ सर्रासपणे वापरत आहे. सदरचा पदार्थ हा आरोग्यास हानिकारक आहे. असे असतानाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन आपला त्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे.




Total Users : 624492