spot_img
spot_img

शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी येत्या एक मार्चपासून भाविकांना ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):-शनि शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी येत्या एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी ब्रँडेड कंपनीचे खाद्यतेल भाविकांना शनिमूर्तीवर अर्पण करता येणार आहे. तसा निर्णय शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि शिंगणापूरच्या ग्रामसभेतही घेण्यात आला.

यामुळे शिंगणापूरातील भेसळीच्या तेलाला प्रतिबंध बसणार आहे. शिंगणापूरात चौथऱ्यावर जावून शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. एक मार्चपासून फक्त ब्रँडेड कंपनीचे म्हणजे भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या तेलाचाच स्वीकार तैलाभिषेक व शनिदेवास अर्पण करण्यासाठी देवस्थानकडून केला जाणार आहे.

भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. तपासणीसाठी पाठवलेल्या तेलात, जर दोष आढळला, तर त्यास देवस्थान जबाबदार राहणार नाही, असे देवस्थाकडून स्पष्ट करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!