spot_img
spot_img

राहत्यातील अतिक्रमण मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चितळी गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूस शासकीय जागेवरील रस्त्याच्या मध्यभागा पासून दोन्ही बाजूस १२ मीटर अंतराच्या आतील हसणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू होती शहरातील नागरिकांची गर्दी तसाच कर्मचाऱ्यांचा फोजफाटा यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे काशिनाथ गुंजाळ राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या निगराणीखाली राहाता ते चितळी गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटर अंतरावरील असणारे शासकीय जागेवरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची मोहीम २७ फेब्रुवारी पासून सुरू झाली ही मोहीम 28  फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी देखील सुरूच असल्याने अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण धारकांची धावपळ दुसऱ्या दिवशी देखील बघायला मिळाली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून राहत्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सार्वजनिक बांधकाम विभाग व राहता नगरपरिषदेचे व पोलीस प्रशासन यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली. अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्यानंतर जवळपास बहुतांशी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आकमण काढून घेतल्याने प्रशासनाने शुक्रवारी रस्त्याच्या मध्यभागा पासून मोजमाप घेत उर्वरित राहिलेले अतिक्रमण काढण्याची नोंदवती घेतली. ४ जेसीपी , नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे ४० कर्मचारी १ पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, राहाता पोलीस ठाण्याचे १० व श्रीरामपूर येथील २० पोलिसांचे आर.सी.पी पाटून यांच्या मित्रांनी खाली ही मोहीम राबविण्यात सुरुवात झाली.

सकाळी शहरात नागरिकांनी सुरू असलेली अतिक्रमण मोहीम बघण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने शहराला छवणीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस शासकीय जागेवरील अतिक्रमण काढल्यामुळे रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आला परंतु ज्या व्यवसायिक तसेच रहिवासी यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण होते त्यांच्यावर प्रशासनाचा हातोडा पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसून आली.त्यामुळे एकंदरच अतिक्रमण काढल्यामुळे शहरात कही खुशी कही गम असे चित्र बघायला मिळाले.

राहाता शहरातील १४ चारी परिसरात शासकीय जागेवरील असणारे रहिवाशांचे अतिक्रमणात घरे जमीनदोस्त झाली त्यातील बहुदा कुटुंबीयांना घरकुल योजना घरे मिळाले आहे परंतु अनेकांनी ती भाडे तत्त्वावर दिली आहे तर काहींनी ती परस्पर विकली असल्याची चर्चा आहे तर प्रशासनाने शासकीय जागेवरील असणारे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता नगरपरिषदेने स्वतंत्र कर्मचारी यांची नियुक्ती करून अतिक्रमण मुक्त करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करावी तरच या मोहिमेचा उपयोग होईल अन्यथा पुन्हा जैसी थी परिस्थिती होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे) 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!