24.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी बालआनंद मेळावा हा स्त्युत्य उपक्रम – सौ.रत्नमाला लंघे – पाटील!

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):- जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नविन चांदगांव (ता.नेवासा) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळामध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी बाल आनंद मेळावा व मात्तृपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. रत्नमाला विठ्ठलराव  लंघे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी व्यासपिठावर सरपंच सौ.सुरेखा उंदरे, सौ.भारती करडक,शंकरराव उंदरे,उपसरपंच माऊली कुसळकर,सर्जेराव उंदरे,पांडुरंग सोरमारे,बापू कांडेकर आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या आयोजित बाल आनंद मेळावा व महीला दिनाचे आयोजन करुन मात्तृपुजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न संपन्न करण्यात आला.

यावेळी बोलतांना सौ. लंघे – पाटील म्हणाल्या की,नविन चांदगांव येथील प्राथमिक शाळेत विविध उपक्रम आयोजित करुन बालकांच्या सर्वागिण विकासाला दिशा देण्याचे काम केले जात असल्यामुळे या शाळेची उपक्रमशीलता सातत्याने टिकून असून पालक – शिक्षक यांच्यामध्ये असलेल्या या समन्वयामुळे विद्यार्थ्यांची शालेय प्रगतीकडे वाटचाल शिक्षकांचे योगदानामुळेच मोलाची ठरत असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले यावेळी पुढे बोलतांना सौ.लंघे म्हणाल्या की, शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचे ज्ञान असून या ज्ञान व बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळा आनंद निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होऊन मोठ्या उत्साहात भाजीपाला बाजार,संगीत खुर्ची,खाऊचे स्टॉल असे अनेक कार्यक्रम या बाल आनंद मेळावा मध्ये पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद गहिवरुन आलेला होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!