spot_img
spot_img

राहुरी तालुक्यातील तुळापूरात दिवसाढवळ्या दरोडा; महिलेवर ब्लेडने हल्ला, परिसरात भीती

सोनगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे रविवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास घरफोडी व दरोड्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चोरी करताना विरोध करणाऱ्या महिलेवर ब्लेडने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बाबुराव हारदे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून दरोडा टाकला. रमेश हारदे यांची सुन दीपाली हारदे हिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींनी तिच्यावर ब्लेडने वार केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असून, तिला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, चोरीच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली. या वेळी तुळापूरचे सरपंच गणेश पाटील हारदे, सुदाम हारदे पाटील, राजेंद्र सिनारे पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ग्रामस्थांकडून रात्रीच्या गस्तीसह कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!