लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून प्रवरा नदीवर बांधलेले वसंत बंधारे या भागाला मोठा आधार ठरले आहेत. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बंधारे भरले गेल्याने भागातील पाणी प्रश्न दूर होण्यास मदत होईल. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आणण्यास मंत्री विखे पाटील यांची आग्रही भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे प्रवरा नदीवरील बंधारे भरले गेले आहेत.याचा मोठा दिलासा पंचक्रोशीतील गावाऔना मिळाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.ना.विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्या समवेत सुयोग्य नियोजन करून लाभक्षेत्रातील सर्व गावांना पाणी पोहचण्याचे काम झाल्याचा आनंद ग्रामस्थांनी जलपूजन करून व्यक्त केला.प्रवरा परिसरातील आश्वी, चनेगाव,रामपूर , मांडवे गळनिंब ही पाच बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने एकाच दिवशी जलपूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दाढ बुद्रुक या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील आणि ग्रामस्थांनी जलपूजन केले. यावेळी दुर्गापूर,दाढ खुर्द, चणेगांव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे पाणी प्रश्नावर कायमच संघर्ष करीत राहीले.या भागाला पाणी देतानाच जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आपला आहे या भावनेतून अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये कसे येईल यासाठी प्रस्ताव तयार केलेल. पाणी परिषदेच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यात यावेत ही अपेक्षा त्यांची होती. आता सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे त्यामुळे गोदावरी खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी येऊन नाशिक अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागाचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सुटण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री विखे पाटील विशेष प्रयत्नमुळे प्रवरा नदी पात्रातील अकोले पासून तर नेवासामपर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर शेतकऱ्यांनी करावा.पाणी नियोजनबद्ध वापरून आपला शेती व्यवसाय करावा अशी अपेक्षा व्यक्त करताना महिलांनी देखील येणाऱ्या काळात पाण्याचा वापर जपून करावा असे सागत निळवंडे धरणातूनही जिरायत भागाला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न देखील आता कमी झाला आहे. अजूनही काही प्रश्न असले तरी हे प्रश्न येणाऱ्या काळात सोडवले जातील याची ग्वाही सौ.विखे पाटील यांनी दिली.
प्रस्ताविकांमध्ये उपसरपंच नकुल तांबे यांनी मंत्री विखे पाटील यांनी आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी कोणातून पाणी उपलब्ध करून दिले आहे हे पाणी उपलब्ध करून देत असताना प्रत्येक एक बंधारा हा पूर्ण क्षमतेने कसा भरेल याकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे त्यामुळे जून पर्यंत पाण्याची चिंता या भागाची मिटून शेतकऱ्यांना मोठा दिलासा या पाण्यामुळे मिळाला आहे शेवटी नारायण कहार यांनी आभार मानले




Total Users : 635167