कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीक्षेत्र कोल्हार येथे श्रीराम नवमी उत्सव तसेच राष्ट्रीय संत कैकाडी महाराज जयंती निमित्त संगीतमय शिव महापुराण कथेस भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाजा तर्फे सोमवार दि. 31 मार्च 2025 ते रविवार दि.6 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कथाकार ह. भ.प श्री नवनाथ महाराज म्हस्के (सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुकुल, बाभळेश्वर) यांच्या सुश्राव्य आवाजात संगीतमय श्री शिव महापुराण कथेस संध्या. ठीक 7 वा.श्री भगवती माता मंदिरासमोरील प्रांगणात असंख्य भक्तांच्या साक्षीने मोठया उत्साही वातावरणात सुरुवात झाली. कोल्हार बु माजी सरपंच ॲड. सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या हस्ते प्रतिमा तसेच ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी सुरेंद्र भाऊंच्या हस्ते शिव कथाकार ह भ प नवनाथ महाराज म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेंद्र भाऊंनी आपले मनोगत व्यक्त करताना गेली तीन-चार वर्षापासून श्रीराम नवमी तसेच कैकाडी महाराज जयंती निमित्त परंपरेचा वारसा जपत कोल्हार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उत्कृष्ट विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल श्रीराम नवमी उत्सव समितीचे कौतुक केले. तसेच सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले. परंपरेचा वारसा जपत कोल्हार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उत्कृष्ट धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबद्दल प्रथम दिवस सप्तनिक ग्रंथ व प्रतिमा आरतीचा मान श्री निलेश राऊत, सुनिल राऊत भरत घुले तसेच पत्रकार गणेश सोमवंशी यांना मिळाला.
यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वप्निल भाऊ निबे, कोल्हार भगवतीपुरचे माजी सरपंच रावसाहेब कमळाजी खर्डे, भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त वसंतराव खर्डे, ऋषिकेश खांदे, अरुण फोपसे कोल्हार बुद्रुकचे माजीउपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त अजित मोरे,केतन लोळगे,विजय डेंगळे तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.



