spot_img
spot_img

गुंगीकारक औषध विक्री करणारा आरोपी मुद्देमालासह ताव्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज दिनांक ०२/०४/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाली की, इमस नामे मतीन शेख, श्रीरामपूर हा डावखर मळा, वार्ड नं ०७ श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळया व इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीसांनी पंचासह सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मतीन मेहबुब शेख, वय. १९ रा. नेहरूनगर, वार्ड नं ०१, श्रीरामपूर, जि-अहिल्यानगर, असे असल्याचे सांगितले.

त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मेफेटरर्मोन इंजेक्शनच्या (TERMIVA) व मेफेटरर्मोन इंजेक्शनच्या (HYTER-M) अशा नावाच्या गुंगीकारक व मानवी शरीराला अपायकारक असलेल्या इंन्जेक्शनच्या औषधी बाटल्या मिळुन आल्या. सदर इंन्जेक्शन विक्री करण्याचा त्याचेकडे कुठलाही परवाना नसुन असे इंन्जेक्शन ताब्यात ठेवणेबाबत कुठल्याही वैदयकिय अधिकाऱ्याची पावतीही त्याचेजवळ मिळुन आली नाही. त्यामुळे सदर इसम मतीन शेख यास ताब्यात घेवून त्याचेविरुध्द तसेच सदर इंन्जेक्शन त्याला पुरविणारा त्याचा भाऊ अॅलेक्स उर्फ मुस्तकिम मेहबुब शेख व इसम नामे ख्वाजा पटेल यांचेविरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ३७७/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम १२३, १२५,२१०,२७८, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी नामे मतीन मेहबुब शेख यास गुन्हयात अटक करण्यात आले असून इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे. नमुद गुन्हयाचा अधिक तपास सपोनि गणेश जाधव हे करीत आहेत.

वर नमुद अटक आरोपीच्या राहते घराची झडती घेतली असता त्याच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे १६ मोवाईल मिळुन आले. सदर मोबाईलबाबत आरोपीने कोणतेही संयुक्तीक उत्तर न दिल्याने ते ताब्यात घेवुन एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल त्यांचेकडे कसे आले याबाबतही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री बसवराज शिवपुजे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख, सपोनि गणेश जाधव, पोसई ठोंबरे, पोसई निकम तसेच पोकों/संपत बडे, पोकों/अजित पटारे, पोकों/आंबादास आंधळे, पोकों/संभाजी खरात, पोकों/अभंग, पोकों/रवि शिंदे, पोकों/ सागर बनसोडे, पोकों/ अमोल पडोळे, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/ धनंजय वाघमारे, मपोकों/अनिता गिते, मपोकों/मुन्तोडे व चालक पोकों/बाळासाहेब गिरी यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!