spot_img
spot_img

विद्यार्थ्यांमार्फत करणार ५०१ झाडांचे वृक्षारोपण-प्रा. दादासाहेब गोलांडे वृंदावन कृषी महाविद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा) :- वृंदावन कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांमार्फत पाचशे एक झाडांचे वृक्षारोपण करणार असा संकल्प प्रा. दादासाहेब गौलांडे यांनी केला.

वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयसिंग लामतुळे म्हणाले की, हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणणारे, शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीणारे, ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’ व ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत म्हणून संबोधले जाणारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या सन्मानार्थ प्रत्येक कृषी पदवीधराणे कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा करावा.

महानायक वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करून महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण पार पाडले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वृंदावन कृषी महाविद्यालय, गुंजाळवाडी पठारचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉ, योगेश एखंडे, प्रा. आशिष सहाणे, डॉ. नितीन परजने, प्रा. प्रतीक्षा गरजे, प्रा. एस. पी. कारंडे, प्रा. प्रसाद पवार तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!