संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यांच्या बलिदानातून आणि संघर्षातून खऱ्याअर्थाने या महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा राहिला आहे त्यांच्या कार्यामुळे राज्याला प्रगतीची दिशा मिळाली असल्याचे गौरवोद्गार आ अमोल खताळ यांनी काढले. .
महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडासंकुलना मध्ये आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक समीर बारवकर नायब तहसीलदार संदीप भांगरे, गणेश अढारी, मिलिंद माळवे, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, भाजपचे शहराध्यक्ष पायल ताजणे, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, आर पी आयचे शहरध्यक्ष कैलास कासार, शशांक नामन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, आज महाराष्ट्र आर्थिक, औद्योगिक, शेती व कामगार क्षेत्रामध्ये देशात अग्रस्थानी काम करत आहे. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असून राज्याची विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करताना महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे.महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या संघर्षातून राज्याच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले गेले होते, त्या दिशेने आज राज्याची वाटचाल सुरू असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
संगमनेर तालुका आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विकासात संगमनेर तालुक्याचा खूप मोठा वाटा राहावा, तसेच रोजगार व आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तालुका परिपूर्ण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
– अमोल खताळ( आमदार)



