राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी येथे काल घडलेल्या घटनेत आजोबावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचेकडुन मुळा धरण परिसरातुन ताब्यात. आरोपीकडुन गावठी कट्टयासह २,०४,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांना यश मिळाले आहे.
दि. 29 रोजी सकाळी ६ वा. चे सुमारास फिर्यादी दगडु गंगाराम कोहकडे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी जि. अहिल्यानगर याचेवर आरोपी नामे प्रविण बाबासाहेब कोहकडे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी याने गुन्हा दाखल केल्याचे कारणावरुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गावठी कट्टयातुन गोळीबार करुन पळुन गेला होता. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 624/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 सह आर्म ऍ़क्ट कायदा कलम 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. सदर पथक आरोपीचा शोध घेत असतांना पथकास आरोपी हा बारागांव नांदुर ते मुळा डॅम परिसरामध्ये संशयीतरित्या फिरत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी एक काळे रंगाचे जॅकेट घातलेला इसम विना नंबरचे मोटारसायलवर जातांना दिसुन आला. पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रविण बाबासाहेब कोहकडे वय 22 वर्षे, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमाचे कब्जातुन 30,000/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र), 4000/- रुपये किमतीचे 04 जिवंत काडतुस, मोबाईल, गावठी कट्टा ठेवण्याचे लेटर पाऊच, काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकुण 2,04,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करुन त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.




Total Users : 660547