spot_img
spot_img

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; श्रीरामपूर तालुक्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बापू शंकरराव शेरकर (वय ४२) आणि आकाश बापू शेरकर (वय २१, दोघे रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आकाश शेरकर याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २६ मे रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी दुकानाकडे जात असताना आकाश शेरकर याने तिला बोलावून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाबरलेल्या मुलीने तातडीने घरी जाऊन कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित महिलेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तसेच, फिर्यादीत आणखी एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या सुनेशी बापू शेरकर यांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियम, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!