नवी दिल्ली(जनता आवाज वृत्तसेवा):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला भेट देत सीजेपीचे नेते अभिजित दीपके यांची भेट घेतली. आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी, “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोणत्याही दबावाला घाबरू नका, शेवटपर्यंत लढा,” असा संदेश दिला.
दिल्लीतील आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. त्यांनी अभिजित दीपके यांच्यासह इतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलनाची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावरील कथित पोलीस कारवाईची माहिती घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “काल तुम्ही दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील युवक देशाच्या तरुणांचे नेतृत्व करत आहे. तुम्ही निडरपणे लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.” तसेच “सरकार बदलल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.



