spot_img
spot_img

गुरुकुल संपदा स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-   हातात तिरंगा ढोल लेझीम गजर वारकरी परंपरेचा जागर आणि मनात राष्ट्रप्रेम अशा वातावरणामध्ये  राहाता तालुक्यातील कोल्हार येथील  गुरुकुल संपदा स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित गुरुकुल संपदा स्कूल , येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी मेजर  अतुल नलगे सर,  .सुधीर आहेर सर , सौ. संचालिका सारिका मॅडम तसेच संस्थेचे संस्थापक ॲड. संपतराव खर्डे पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याच दरम्यान कॉपी मुक्त अभियान , तंबाखूमुक्त अभियान , व्यसनमुक्ती अभियान वर आधारित प्रतिज्ञा घेण्यात आली . प्रतिज्ञा नंतर रंगीत संगीत कवायत घेण्यात आली .

नर्सरीपासून प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला .चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर वेशभूषा, देशभक्तीपर गीते आणि नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि देशभक्तीची भावना आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे व्यक्त केली.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता ‘ वंदे मातरम् ‘ ने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अशा प्रकारे देशभक्ती, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!