spot_img
spot_img

दलित चळवळीतील पँथर हरपला  राजाभाऊ कापसे यांचे आकस्मित निधन

वाकडी( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते,दलीत चळवळीत मोठे योगदान असलेले आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.

राजाभाऊ कापसे यांनी गेली 25 ते 30 वर्षापासून दलीत चळवळीत सहभागी होत अन्याय विरूद्ध आवाज उठवून लोक हक्कासाठी, सामाजिक विषयावर आंदोलन केले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले  यांच्या सोबत राजाभाऊ कापसे यांनी चळवळीत भाग घेतला होता ना रामदास आठवले  यांचे ते विश्वासू सहकारी होते जन्मभूमी असलेल्या वाकडी गावात व श्रीरामपूर शहरासह खेड्यापाड्यात राजाभाऊ कापसे यांनी आरपीआयच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले गोरगरिबांना वेळोवेळी मदत केली, गरजू व्यावसायिकांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली अगदी लहान थोरापर्यंत राजाभाऊ कापसे यांनी आपली कार्यशीलता जपत कौतुकाची थाप मिळविली.

आरपीआय पक्षाच्या माध्यमातून दहा वर्षात मोठे संघटन तयार करून गाव देश व पक्षहिताचे काम राजाभाऊ कापसे यांनी केले. एक होतकरू, लढाऊवृत्ती,नेहमी चळवळीत सहभाग असणारे व्यक्तिमत्व राजाभाऊ कापसे यांच्या निधनाने दलीत चळवळीचे मोठे नुकसान झाले असून राजाभाऊ कापसे यांच्या दुःखद निधनाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी शोक व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!