spot_img
spot_img

सभापती प्रा. राम शिंदे यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी सखोल चर्चेनंतर त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असे बोलले जात आहे.

दरम्यान,आज  उमेदवारी अर्जांची मुदत संपल्यानंतर उद्या (दि. ६) अर्जांची छाननी होणार असून बुधवारपासून वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. माघारीनंतर निवडणूक बिनविरोध न झालेल्या जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.

सभापती राम शिंदे यांच्या माघारीमुळे अजून नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण अजून पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव या ठिकाणी उमेदवारीवरून तेढ  निर्माण झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय  नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे  नजरा लागल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!