spot_img
spot_img

संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पूल रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर! आ. अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश 

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर शहरातील पायाभूत सुविधा च्या विकासाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा २०२६-२७ च्या अंतर्गत संगमनेर बसस्थानक बांधकाम विभाग कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली नाका मार्गे प्रवरा नदीवरील पूल या रस्त्याचे नागरी सविधासह विकास काम करण्यासाठी १० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली 

संगमनेर शहराच्या बस स्थानक ते तीन बत्ती चौक मार्गे प्रवरा नदी फुला पर्यंत हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या मार्गावरून वाहनांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचा नागरी सुविधांसह विकास झाल्यास शहरा तील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त आणि सुसूत्रता प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच रस्त्याच्या विकासामुळे नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

संगमनेर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

संगमनेर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. संगमनेर बसस्थानक ते प्रवरा पूल या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.

   अमोल खताळ पाटील 

    (आमदार, संगमनेर विधानसभा)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!