spot_img
spot_img

लोणीत २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; सासरच्या सहा जणांवर गुन्हा घरासाठी पैसे, गॅरेजसाठी तीन लाखांची मागणी केल्याचा आरोप; छळाला कंटाळून टोकाचे पाऊल घेतल्याची फिर्याद

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सासरच्या मंडळींकडून घरासाठी पैसे तसेच गॅरेज सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप मयत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी रोहित कु-हे (वय २२, रा. लोणी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू नंदा शरद कु-हे, सासरे शरद दत्तात्रय कु-हे, पती रोहित शरद कु-हे, वैष्णवी उर्फ ललिता शरद कु-हे, तृप्ती पाटील आणि तुषार माघाडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, विवाहानंतर साक्षी ही लोणी येथे सासरी राहत होती. सासरच्या मंडळींकडून घरासाठी पैसे तसेच पतीला गॅरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली जात होती. पैसे देण्यास विलंब झाल्याने तिला शिवीगाळ, टोमणे आणि मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या छळाला कंटाळून साक्षी हिने १७ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे पुढील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!